श्री 1008 पार्श्वनाथ जिन मंदिर / श्री शांतिनाथ जिन मंदिर बेडकिहाळ
साधर्मिक भक्ती कार्यक्रम
सर्व श्रावक व श्राविकांना कळविण्यात येते की, स्वस्तिश्री जगद्गुरु जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदणी यांच्या मंगल सानिध्यात, वर्धमान परिवार सेवा ट्रस्ट भिवाडी, राजस्थान यांचे वतीने, जिन धर्मानुसार वात्सल्य अंगार्तंगत *’साधर्मिक भक्ति कार्यक्रम’ आयोजन श्री बी. जे. पाटील किणीकर, जैन समुदाय भवन बेडकीहाळ येथे, *ध. श्री उत्तम रावसाहेब पाटील व ट्रस्टी ध. श्री अशोक जैन यांच्या उपस्थितीत दि–24/3/2025 मंगळवार रोजी सकाळी ठीक 9:00 वाजल्यापासून करण्यात आले आहे. या निमित्त सेवा ट्रस्टच्या वतीने समाजातील गुणी व गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप तसेच गरजू व्यक्तिंना शिखरजी यात्रा किट वितरण करण्यात येणार आहे.
*ट्रस्टच्यावतीने जैन महिला आर्थिक सशक्तिकरण, जैन महिला संघ उद्योगास अर्थसहाय्य, गरजू रुग्णांना अर्थसहाय्य या व अशा अनेक योजना रावण्यात येत आहेत. तरी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
*सेवा ट्रस्टच्या वतीने कार्यक्रम समाप्तीनंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कळावे आपले विश्वासू
श्री जिनमंदिर कमिटी बेडकिहाळ.